2024 अहवाल प्राप्त, 483 पॉझिटिव्ह, 94 डिस्चार्ज

          अकोला,दि. 21 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2024 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1541 अहवाल निगेटीव्ह तर 483 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 94  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.20) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 60 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 24409(20228+4004+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 142263 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 139719 फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2165  नमुने होते. आजपर्यंत एकूण 142163 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 121935 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

483 पॉझिटिव्ह

       आज सकाळी ३४८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७९ महिला व २६९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  बार्शीटाकळी येथील ५३, तेल्हारा येथील ४६, हिवरखेड येथील १८, डाबकी रोड येथील १६, पातूर येथील १४, भंडारज बु. येथील  १२, बोरगाव येथील ११, जीएमसी व पारस येथील प्रत्येकी नऊ, खडकी, अडगाव बु., बाळापूर येथील प्रत्येकी सात, बाळापूर नाका व कृषी नगर येथील प्रत्येकी चार, शिवसेना वसाहत, खदान, सोनटक्के प्लॉट, अकोट फैल, चांडक प्लॉट, वाडेगाव, मोठी उमरी दोनवाडा, जवाहर नगर, खोलेश्वर, टिटवा व नाकथाना येथील प्रत्येकी तीन, हरिहर पेठ, जूने शहर, गजानन नगर, रणपिसे नगर, बोरगाव वैराळ, मुर्तिजापूर, मलकापूर, झुरळ बु., उरळ बु., पिंपळखुटा, व्हिएचबी कॉलनी,  पोळा चौक, कोळंबी, चांदुर व केळकर हॉस्पीटल येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित शास्त्री नगर, कच्ची खोली, उगवा, जूने आरटीओ रोड, कौलखेड, विवरा, मालसूर, नेरधामणा, जाजू नगर, गिता नगर, इंद्रा कॉलनी, भिम नगर, अंबिका नगर, खरप, फडके नगर, तिवसा, तारफैल, सालसार मंदिर, माधव नगर, आश्रय नगर, गुल्दवाला प्लॉट, हमजा प्लॉट, माळीपुरा, गुडधी, देगाव, मांडवा, तळेगाव बाजार, पाथर्डी, नयागाव, राधेनगर, गणेश सोसायटी, निमवाडी, सिंध्दी कॅम्प, वनीराम, लक्ष्मीनगर, हाता, नयाअंदुरा, वाशिम बायपास, रिधोरा, राहुलनगर, लहान उमरी, कंवर नगर, तापडीया नगर, अमाखाँ प्लॉट, महागाव, म्हैसपूर, रजपूतपुरा, गोरक्षण रोड, रामदासपेठ, शास्त्री नगर, शिवाजी नगर, साई नगर, अनिकट, लकडगंज, मोहता मिल, चिखलगाव, दापकी, खेळखुसांजी, तळेगाव पार्तुडा, बलवंत कॉलनी, सातव चौक, जठारपेठ, हिंगणा फाटा, सोमथाना व अमोदा ता.अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी १३५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३९ महिला व ९६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील १३, मोठी उमरी येथील ११, लहान उमरी येथील सहा, कौलखेड, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी पाच, गांधीग्राम, डाबकी रोड व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, सुधीर कॉलनी व खदान येथील प्रत्येकी तीन, कमला नगर, कमल सोसायटी, न्यु खेतान नगर, देशमुख फैल, लक्ष्मी नगर, शमशेरपुर व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित न्यु तापडीया नगर, आळशी प्लॉट, गंगा नगर, खरप बु., भारती प्लॉट, चैतन्यवाडी, रवीनगर, दुर्गा चौक, बिर्ला कॉलनी, गड्डम प्लॉट, खेडकर नगर, दहिहांडा, कृषी नगर, अशोक नगर, कांचनपुरा, कासनापूर, बाळापूर, अकोट फैल, दगडूगाव, खडकी, शास्त्री नगर, पिंपळनेर, दिग्रज कारडे, नेरधामा, येवतखेड, गजानन नगर, तापडीया नगर, कृषि नगर, शिवनी, रामकृष्ण नगर, कोठारी नगर, एमआयडीसी, पिकेव्ही, सांगवी खुर्द, हिंगणा, सहकार नगर, भंडारज ता.पातूर, गिता नगर, कृषी नगर, खडकी, सांगळूद, गोकूल कॉलनी, तेल्हारा, राम नगर, रणपिसेनगर, घुसर, सिव्हील लाईन पोलिस स्टेशन, अडगाव ता.पातूर, सावतवाडी, जवाहर नगर, व्हीएचबी कॉलनी, केशवनगर, गोरक्षण रोड, मोहिते प्लॉट, न्यु तार फैल, उमरी, नरहरी नगर व पळसोबढे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.   

             दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 60 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 348, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 135 तर रॅपिड चाचण्यात 60 असे एकूण 543 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

94 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून आठ, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, युनिक हॉस्पीटल येथून एक, अवघाते हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून एक, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथून सात, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून सात, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, बॉईज हॉस्टेल अकोला येथून १५, अकोला ॲक्सीडेंट येथून तीन,  आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून दोन, आर्युवेदीक हॉस्पीटल येथून दोन तर कोविड केअर सेंटर बाळापूर येथून दोन जणांना, असे एकूण ९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6224 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 24409(20228+4004+177) आहे. त्यातील 424 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 17761 आहे. तर सद्यस्थितीत 6224  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ