2072 अहवाल प्राप्त, 398 पॉझिटिव्ह, 272 डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

 


अकोला,दि.1 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2072 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1674 अहवाल निगेटीव्ह तर 398 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 272  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 65 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 16608(13700+2731+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 104906 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 102705 फेरतपासणीचे 376 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1825 नमुने होते. आजपर्यंत एकूण 104771 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 91071  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

398 पॉझिटिव्ह

आज सकाळी 212 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 62 महिला व 150 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील 24, मुर्तिजापूर येथील 23, एमआयडीसी येथील 18, अकोट येथील 10, खडकी येथील नऊ, बाळापूर येथील आठ, शेलू बोंडे येथील सात, सुकली, देवली व राम नगर येथील प्रत्येकी पाच, जठारपेठ, जीएमसी, रामदासपेठ व तुरखेड येथील प्रत्येकी चार, अडगाव, गोरक्षण रोड, आदर्श कॉलनी व नया अंदुरा येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, लक्ष्मी नगर, रणपिसे नगर, खदान, कौलखेड, आकाशवाणी, मलकापूर, मोठी उमरी,वरुर, वाशिंबा, जीएमसी हॉस्टेल, हरिहर पेठ, संत नगर, दत्त कॉलनी, अंभोरा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रोहणखेड ता.अकोट, चितलवाडी, हिंगणा रोड, उमरी, किर्ती नगर, पीकेव्ही कॉलनी, गोरेगाव, रजपुतपूरा, वडद बु., एकलरा, लोहारा, देवगाव, विताली, कापरवाडी बु., अन्वी, वनीरंभापूर, मनारखेड, हिवरखेड, तेल्हारा, अकोट फैल, राऊतवाडी,  शिव नगर, गड्डम प्लॉट, संतोषी माता मंदिर, अकोलखेड, तापडीया नगर, वृदावन नगर, मांजरी ता.बाळापूर, परदा  ता.अकोट, न्यु तापडीया नगर, रतनलाल प्लॉट, बार्शिटाकळी, खोलेश्वर, हिंगणा फाटा, न्यु राधाकिसन प्लॉट, घोटा ता.बार्शिटाकळी, पुनोती ता.बार्शिटाकळी, रहित ता.बार्शिटाकळी, जामठी खु. व दहातोंडा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 186  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात  60 महिला व 126  पुरुषांचा समावेश आहे. त्यात पातुर येथील 23, कौलखेड येथील 15, जीएमसी येथील 13,  सिंधी कॅम्प येथील 12, अकोट येथील 10, चानी ता. पातूर येथील नऊ, डाबकी रोड येथील आठ, जूने शहर येथील सहा, जठारपेठ व मोठी उमरी येथील प्रत्येकी पाच, गजानन नगर, रामदासपेठ, राठी पेठेवाला, खडकी, मलकापूर व कळमेश्वर ता.बार्शीटाकळी येथील प्रत्येकी तीन, कलेक्टर कॉलनी, उमरी, तापडीया नगर, पागरा ता.पातूर, अंभोरा, रणपिसे नगर, किर्ती नगर, बाळापूर रोड, बोरगाव मंजू,  आदर्श कॉलनी व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित हनुमान नगर, दोनवाडा, चतुभुज कॉलनी, खदान, लहान उमरी, कापसी, टॉवर चौक, हिंगणा फाटा, अकोली, श्रावगी प्लॉट, पत्रकार कॉलनी, गांधी ग्राम, तारफैल, पंचशील नगर, रतनलाल प्लॉट, बापु नगर, माता नगर, अशोक नगर, न्यु गोडबोले प्लॉट, कान्हेरी गवळी, हिंगणा रोड, चौरे प्लॉट, हमजा प्लॉट, शास्त्री नगर, सातव चौक, महसूल कॉलनी, जूने खेतान नगर, केशव नगर, पिंजर, जेल क्वॉटर,  जवाहर नगर, राधाकिसन प्लॉट, मुकूंद नगर, माधव नगर, नयागाव, खोलेश्वर, रजपूतपुरा, कोठीरी वाटीका, श्रध्दा नगर व बडेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 65 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 212, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 186 तर रॅपिड चाचण्यात 65 असे एकूण 463 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

                                   272 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 43, स्कायलार्क येथील सहा, आर्युवेदिक महाविद्यालयातून 17, बिहाडे हॉस्पीटल येथील  आठ, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच तर होम आयसोलेशन येथील 180 जणांना असे एकूण 272 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

तिघांचा मृत्यू

दरम्यान आज तिघांचे मृत्यू झाले. त्यात शिलोडा, अकोला येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 28 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य दोघांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात जूने शहर येथील रहिवासी असलेल्या 61  वर्षीय पुरुष रुग्णास दि. 15 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते, अन्य बारा ज्योतिर्लींग मंदिर जवळ, अकोला येथील रहिवासी असलेल्या 88  वर्षीय रुग्णास दि. 18 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. अशी माहिती सकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

3664 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 16608(13700+2731+177) आहे. त्यातील 370 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 12574 आहे. तर सद्यस्थितीत 3664  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना