1951 अहवाल प्राप्त, 305 पॉझिटिव्ह, 321 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू


अकोला,दि. 10 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1951 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1646 अहवाल निगेटीव्ह तर 305 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 321  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 86 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 19891(16379+3335+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 122989 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 120585 फेरतपासणीचे 377 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2027  नमुने होते. आजपर्यंत एकूण 122825 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 106446 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

305 पॉझिटिव्ह

आज सकाळी २३५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७९ महिला व १५६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील २५, सावरा येथील १३, डाबकी रोड येथील १२रामदास पेठ, मलकापूर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी आठ, जीएमसी, बाळापूर, मुर्तिजापूर, गौरक्षण रोड, शास्त्री नगर येथील प्रत्येकी सात, कौलखेड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी सहा, लहान उमरी, हरीहर पेठ, रामनगर, अमाखा प्लॉट व खडकी येथील प्रत्येकी पाच, विद्या नगर, किर्ती नगर, शिवणी, खदान, रजपूतपुरा, पळसोबढे व नेवारे नगर येथील प्रत्येकी चार, बालाजी नगर, हिंगणा, रतनलाल प्लॉट, शारदा नगर, खेडकर नगर, आदर्श कॉलनी, जामकी, महसूल कॉलनी व टेलीफोन कॉलनी येथील प्रत्येकी तीन, न्यु राधाकिशन प्लॉट, गिरडवाडी, खोलेश्वर, सांगळूद, हातगाव, शंकर नगर, गिता नगर व गोपालखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पंचशील नगर, नगरपरिषेद कॉलनी, बटवाडी, कोठारी वाटीका, संतोष नगर, महाकाली नगर, खंडाळा, चांदूर, जूनी वस्ती, वरुड, गजानन नगर, सोनोरी, सस्ती वाडेगाव, वनी रंभापूर, पोलिस हेडक्वॉटर, तेल्हारा, बैद्यपुरा, अकोट फैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ७० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ११ महिला व ५९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील दहा, जीएमसी व हिवरखेड येथील प्रत्येकी सहा, केडिया प्लॉट येथील चार, डाबकी रोड, तापडिया नगर व मोठी उमरी  येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर, अनीकट, शास्त्रीनगर, खदान, रामदासपेठ, केशवनगर, थार  व कारला येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित किर्ती नगर, अकोट फाइल, पोळा चौक, मोहम्मद अली चौक, पंचशील नगर, बाळापूर नाका, सुधीर कॉलनी, चांदुर ,भिमनगर, केला प्लॉट, सल्पीकोठारी बाजार, गुरुदेव नगर ,महाकाली नगर ,रजपुतपुरा, रतनलाल प्लॉट, भांबेरी, शिवर व शिवणी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 86 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 235, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 70 तर रॅपिड चाचण्यात 86 असे एकूण 391 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

                                   321 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ५५, युनिक हॉस्पीटल येथून दोन, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, ग्रामीण आरोग्य बार्शीटाकली येथून एक, आयकॉन हॉस्पीटल येथून १०बिहाडे हॉस्पीटल येथून सहा, अवघाते हॉस्पीटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून ११सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, बॉईज होस्टेल अकोला येथून १२, सहारा हॉस्पिटल येथून दोन, आधार हॉस्पीटल मूर्तिजापूर येथून चार, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, कोविड  केअर सेंटर बाळापूर येथून एक, उपजिल्हा आरोग्य मूर्तिजापूर येथून एक, कोविड  केअर सेंटर तेल्हारा येथून तीन, कोविड  केअर सेंटर अकोट येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथुन तीन, तर होम आयसोलेशन येथून २०० अशा एकूण ३२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दोंघाचा मृत्यू झाला. त्यात रेणूका नगर, अकोला येथील रहिवासी असलेला 55  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 1 रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य महसूल कॉलनी, अकोला येथील रहिवासी असलेली 76 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 5 रोजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.

4837 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 19891(16379+3335+177) आहे. त्यातील 391 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 14663 आहे. तर सद्यस्थितीत 4837  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ