अकोला,दि. 1(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.28) दिवसभरात झालेल्या 511 चाचण्या झाल्या त्यात 65 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली.
आज दिवसभरात अकोला येथे 325 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोट येथे 46 चाचण्या झाल्या
त्यात 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, मुर्तिजापूर
येथे 26 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातून 86 चाचण्या झाल्या त्यात 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे सहा व आरोग्य
कर्मचाऱ्यांचे 22 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह
आला नाही, असे एकूण 511 चाचण्यांमधून 65 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 36 हजार 665 चाचण्या झाल्या
पैकी 2798 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा