जिल्हा परिषद व पंचायत समित्याचे सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी मंगळवारी(दि.23) सोडत

 


         अकोला,दि. 17(जिमाका)- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 14 जागांचे व सातही पंचायत समित्याच्या 28 जागांचे सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित करण्याकरीता मंगळवार दि. 23 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.

       जिल्हा परिषदेकरीता सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत जिल्हाधिकारी यांनी मंगळवार दि. 23 रोजी तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी सबंधीत तहसिलदार यांनी मंगळवार दि. 23 रोजी  सोडत घ्यावी. तसेच अंतिम आरक्षण सुधारणा आदेशाच्या स्वरुपात शासन राजपत्रात बुधवार दि. 24 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन