जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी यांनी केला महिला बिएलओचा सन्मान

 



अकोला,दि.8 (जिमाका)- जागतिक महिला दिनानिमित्त नियोजन भवनात निवडणूकीच्या कामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बि.एल.ओ) यांना प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवदास शेलार आदि, उपस्थित होते.

यावेळी  जिल्हाधिकारी म्हणाले की, निवडणूकीच्या कामामध्ये महिला बिएलओची मतदारांचे नोंदणी करण्याची महत्वाची कामगीरी केली आहे. घरोघरी भेट देवून नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादीमधील दुरुस्तीचे असे महत्वाचे कामे करत असतात. यामुळे अचुक मतदारांची नोंद होवून लोकशाही बळकट होण्यास मदत होते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.

यावेळी मतदान केंद्रस्तरीया अधिकारी सोनल शिंदे, अर्पणा ढोरे, सुरेखा वाहने, प्रतिभा जोशी, सविता पोटे, सविता वानखडे, अकोला तहसिल कार्यालयाचे मतदार साक्षरता क्लबच्या उमा गावंडे, वर्षा ठाकरे, वनीता मडावी, शोभा तायडे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवडणूक कार्यालयाचे नायाब तहसिलदार घुगे, वैद्यनाथ कोरकाने, उमेश वैद्य, दिनेश सोनोने, पियुष वानखडे यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ