रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 1744 चाचण्यात 119 पॉझिटीव्ह


          अकोला,दि. 31(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.30) दिवसभरात झालेल्या 1744  चाचण्या झाल्या त्यात 119  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात अकोट येथे 42 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे 21 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, पातूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 16 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला,  मुर्तिजापूर येथे 121 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  अकोला महानगरपालिकेतून 1408  चाचण्या झाल्या त्यात 78 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला आयएमए येथे 61 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 60 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर बार्शीटाकळी येथे 13 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 1744 चाचण्यात 119 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 64 हजार 351 चाचण्या झाल्या पैकी 5080 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ