रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 129 चाचण्यात 42 पॉझिटीव्ह

 


          अकोला,दि. 22(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.21) दिवसभरात झालेल्या 129 चाचण्या झाल्या त्यात 42 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

          काल दिवसभरात पातूर येथे 45 चाचण्या झाल्या त्यात दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 75 चाचण्या झाल्या त्यात 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर अकोला येथे पाच, तेल्हारा येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 129 चाचण्या 42 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 49 हजार 936  चाचण्या झाल्या पैकी  4115 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ