587 अहवाल प्राप्त, 212 पॉझिटिव्ह, 334 डिस्चार्ज, दोघांचे मृत्यू


         अकोला,दि. 15 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 587 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 375 अहवाल निगेटीव्ह तर 212 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 334  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.14) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 36 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 21847(18073+3597+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 131861 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 129407 फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2075  नमुने होते. आजपर्यंत एकूण 131727 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 113654 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

212 पॉझिटिव्ह

       आज सकाळी २१२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६६ महिला व १४६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील १४, मोठी उमरी येथील ११, गोरक्षण रोड व मलकापूर येथील आठ, रणपिसे नगर व जीएमसी येथील प्रत्येकी सात, डाबकी रोड येथील सहा, सहकार नगर येथील पाच, न्यु राधाकिसन प्लॉट, कौलखेड, खेडकर नगर, रतनलाल प्लॉट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी चार, शिवनगर, बाळापूर, गणेश नगर, हिंगणा रोड, रजपूतपुरा, अकोट, लहरिया नगर, सोमथाना व शिवणी येथील प्रत्येकी तीन, खडकी, आनंद नगर, पातूर, आळशी प्लॉट, तापडीया नगर, जूने शहर, इंद्रिरा नगर, आदर्श कॉलनी, गांधी रोड, गुडधी, अनिकेत, शिवसेना वसाहत, खोलेश्वर, माणिक टॉकीज, अंबर न्यायधीस निवारा, राऊतवाडी, मुर्तिजापूर, कैलास टेकडी, संतोष नगर व अंनत नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित भिम नगर, कोठारी वाटीका, शिवाजी नगर, संग्रामपूर, पत्रकार कॉलनी, कृषी नगर, शास्त्री नगर, बिर्ला कॉलनी, बार्शीटाकळी, न्यु भिम नगर, देशमुख फैल, स्वालंबी नगर, जीएमसी क्वॉटर, गांधी नगर, परिवार कॉलनी, मानिक टॉकीज, टेलीफोन कॉलनी, एमआयडीसी, मोमीनपुरा, तारफैल, शास्त्री नगर, वाशिंबाम्हाडा कॉलनी, वाशिम बायपास, खरप रोड, तोष्णीवाल लेआऊट, आंबेडकर चौक, शंकर नगर, दुर्गा नगर, मोहाळी सांगवी, चोहट्टा बाजार, शंकर नगर, गांधी रोड, कृषी नगर, पारस, उमरी, जठारपेठ, गायत्री नगर, तिलक रोड, गंगाधर प्लॉट, केशव नगर, जूने आरटीओ, महात्मा फुले नगर, मुलानी चौक, तुकाराम चौक,माधव नगर, गाडगे नगर, सांगवी बाजार, ज्ञानेश्वर नगर, भारती प्लॉटहरिहर पेठ, गणेश नगर, रामदासपेठ, दुर्गा चौक, भारती प्लॉट, मालीपुरा, गायगाव, संत कवर नगर व बाबुळगाव येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

        दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 36 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 212, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात निरंक तर रॅपिड चाचण्यात 36 असे एकूण 248 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

334 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४०, ओझोन हॉस्पीटल येथील  पाच, युनिक हॉस्पीटल येथून दोन, नवजीवन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील १४, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथील तीन, आर्युवेदिक महाविद्यालयातून १२, तर होम आयसोलेशन येथील २५० जणांना असे एकूण ३३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज सांयकाळी दोघांचा मृत्यू झाला. त्यात म्हातोडी, अकोला येथील रहिवासी असलेली 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य गुलजारपुरा, अकोला येथील रहिवासी असलेला 82 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 14 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.

5096 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 21847(18073+3597+177) आहे. त्यातील 404 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 16347 आहे. तर सद्यस्थितीत 5096  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ