अल्‍पसंख्‍यांक समाजातील उमेदवारांसाठी पोलीस शिपाई भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रम

 

 

   अकोला,दि.4(जिमाका)- सन २०२०-२०२१ या वर्षासाठी अल्‍पसंख्‍यांक समाजातील उमेदवारांसाठी पोलीस शिपाई भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कै.केशरबाई सोनोने बहुउददेशिय विकास स्‍वयंसेवी संस्‍था महसुल कॉलनी, अकोला (श्री सोनोने सर मोबाईल क्रमांक 7030997756) या संस्‍थेची निवड शासनस्‍तरावरून करण्‍यात आली आहे. पोलीस शिपाई भरती पुर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शासनाच्या अटी, शर्ती व नियमानुसार १०० प्रशिक्षणार्थीची निवड करण्‍यास मान्‍यता मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

अल्‍पसंख्‍यांक समाजातील विदयार्थ्‍यांना विहीत नमुन्‍यातील अर्ज सर्व संबधीत उपविभागिय अधिकारी कार्यालयात व संबधित पोलीस स्‍टेशनमध्‍ये २० नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्‍ध आहे. अल्‍पसंख्‍यांक (मुस्‍लीम, ख्रिश्‍चन, बौध्‍द, शीख, फारसी, जैन, ज्‍यु) समाजातील प्रशिक्षणार्थीची जिल्‍हयातील प्रत्‍येक उपविभागीय कार्यालयात उपविभागिय अधिकारी व उपविभागिय पोलीस अधिकारी हे 24 नोव्हेंबर रोजी उपविभागिय कार्यालय अकोला येथे 35, मुर्तिजापूर येथे 30, अकोट येथे 30, तर बाळापूर येथे 30 प्रशिक्षणार्थीचे अर्ज स्विकारून, अर्जाची छाननी करून अल्‍पसंख्‍याक   (मुस्‍लीम, ख्रिश्‍चन, बौध्‍द, शीख, फारसी, जैन, ज्‍यु) यांचे शासनाच्या अटी, शर्ती व नियमानुसार निवड करुन निवड केलेल्‍या प्रशिक्षणार्थीच्या नावाची यादी, अर्जासह जिल्हा निवड समितीकडे 27 नोव्हेंबरपर्यंत पाठवावी. अल्‍पसंख्‍यांक समाजातील 100 प्रशिक्षणार्थी यांची प्रशिक्षणासाठी अंतिम निवड जिल्हा निवड समिती करतील.

उमेदवारांच्‍या निवडीसाठी अटी व शर्ती

प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्‍पन्‍न रू 2 लक्ष 50 हजार रुपयापेक्षा जास्‍त  नसल्‍याचा पुरावा, उमेदवार हा अल्‍पसंख्‍याक (मुस्‍लीम, ख्रिश्‍चन, बौध्‍द, शीख, फारसी, जैन, ज्‍यु) समाजातील असावा,  उमेदवार हा 18 ते 25 वयोगटातील असावा, उमेदवाराची उंची पुरूष 165 सेंमी व महिला 155 सेंमी छाती पुरूष 79 सेंमी(फुगवून 84 सेंमी) असावी, शैक्षणिक पात्रता इ. 12 वी पास असावा, उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता,आधारकार्ड इत्यादी कागदपत्राच्‍या सत्‍यप्रती अर्जासोबत देणे आवश्‍यक आहे, उमेदवार शारिरीकदृष्‍टया निरोगी व सक्षम असावा, 

प्रशिक्षणाचे स्‍वरूप

या योजनेअंतर्गत एकुण दोन महिने (50दिवस) प्रशिक्षण दिले जाईल या  दरम्‍यान दररोज तीन तासांचे वर्ग प्रशिक्षण व दोन तासांचे मैदानी प्रशिक्षण देण्‍यात येईल, निवडलेल्‍या प्रत्‍येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षण कालावधीत रु. एक हजार पाचशे प्रतिमाह प्रमाणे विदयावेतन देण्‍यात येईल,  निवडलेल्‍या प्रत्‍येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणा दरम्‍यान मैदानी प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण संस्‍थेमार्फत चहापान व अल्‍पोहार देण्‍यात येईल, निवडलेल्‍या प्रत्‍येक प्रशिक्षणार्थीस गणवेश साहित्‍यासाठी  एक हजार रुपये अनुदान देण्‍यात येईल, निवडलेल्‍या प्रत्‍येक प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणा दरम्‍यान निवासाची व्‍यवस्‍था स्‍वत; करावी लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना