रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 129 चाचण्या, 12 पॉझिटिव्ह

 अकोला,दि. 28 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 129 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे 14 चाचण्या झाल्या त्यात एक जण पॉझिटीव्ह आला. बाळापुर येथे 10 चाचण्या झाल्या त्यात एकही पॉझिटीव्ह आला नाही. बार्शी टाकळी येथे चार जणांच्या चाचण्या झाल्या त्यात  एकही जण पॉझिटीव्ह आला नाही. मुर्तिजापूर येथे चार जणांच्या चाचण्या झाल्या तेथेही कुणीही पॉझिटीव्ह आला नाही. आयएमए येथे 12 चाचण्या झाल्या त्यात एक जण तर  36 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यातही कुणीही पॉझिटीव्ह आला नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  40 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. हेडगेवार लॅब येथे नऊ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे असे एकूण 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आजपर्यंत 25028 चाचण्या झाल्या त्यात 1768 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ