अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2020, विधानपरिषद निवडणूकीमध्ये मत कसे नोंदवावे ?

 अकोला,दि. 11 (जिमाका) अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीमध्ये  मतदारांनी मत कशा प्रकारे नोंदवावे ? या बाबत विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ यांनी  प्रसिध्दीसाठी माहिती दिली आहे. ती पुढील प्रमाणे

विधानपरिषद निवडणूकीमध्ये मत कसे नोंदवावे.

केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळया शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे. इतर कोणत्याही पेन, पेन्सिल, बॉल पेन चा वापर करण्यात येऊ नये. तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम नोंदवावा या रकाण्यात 1 हा अंक लिहून मत नोंदवावे. निवडणूक द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता.

 आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2,3,4 इत्यादी प्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये.पसंतीक्रम हे केवळ 1,2,3 इत्यादी अशा अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते एक,दोन,तीन, इत्यादी अशा शब्दांमध्ये नोंदवण्यात यवु नयेत.पसंतीक्रम नोंदवतांना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरुपात जसे 1,2,3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरुपात जसे I,II,III  किंवा मराठी भाषेतील देवनागरी 1,2,3, या स्वरुपात नोंदवावे.मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये.

तसेच मतपत्रिकेवर अंगठयाचा ठसा उमटवू नये.मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवतांना टिकमार्क Pकिंवा क्रॉसमार्क O अशी खूण करु नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल.

आपली पतपत्रिका वैध ठरावी याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक आहे. अनिवार्य नाही. असेही जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ  जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ