263 अहवाल प्राप्त; 40 पॉझिटीव्ह, 18 डिस्चार्ज, दोन मयत

 अकोला,दि. 29 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 263 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 223 अहवाल निगेटीव्ह तर 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  ९३८५(७४८८+१७२०+१७७) झाली आहे. आज दिवसभरात  रुग्णालयात असलेल्या 18 रुग्णांना घरी सोडण्यात आले,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 54371 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 52999  फेरतपासणीचे 246 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1126 नमुने होते. आजपर्यंत एकूण 53953 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 46505 तर पॉझिटीव्ह अहवाल ९३८५(७४८८+१७२०+१७७)आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 40 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात ४० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत. त्यात सकाळीच ४० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १७ महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील न्यू खेतान नगर येथील चार,  आदर्श कॉलनी व कीर्ती नगर येथील  प्रत्येकी तीन, मलकापूर व  मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित गीता भवन, व्ही एच बी कॉलनी गोरक्षण रोड, महसूल कॉलनी,  राम नगर, सत्यदेव नगर, मूर्तिजापूर, नांदखेड ता. अकोट, पंचशील नगर, गोडबोले प्लॉट, किनखेड पूर्णा ता. अकोट, धामना ता. अकोट, गोरक्षण रोड, शंकर नगर, जवाहर नगर, रामदास पोलीस क्वाटर, लहान उमरी, वाशिम बायपास, सातव चौक, बळवंत कॉलनी,  जीएमसी हॉस्टेल, तेल्हारा, जीएमसी, कौलखेड, झेडपी कॉलनी खडकी, अकोट व बाळापूर  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.दरम्यान काल (दि.२८) रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

18 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून सात, ओझोन हॉस्पीटल येथून एक, अकोला अक्सीडेंट क्लीनिक येथून दोन, हॉटेल रिजेंसी येथून एक, तर  हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अशा एकूण 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

दोघांचा मृत्यू

आज दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. त्यात पारस ता. बाळापूर येथील ६६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या रुग्णाचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला त्यांना  दि.२० रोजी दाखल करण्यात आले होते. तर दुपार्नंतर  किनखेड पूर्णा ता. अकोट येथील ६३ वर्षीय महिलेचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. या महिलेस दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते.

625 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ९३८५(७४८८+१७२०+१७७)आहे. त्यातील 293 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8467 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 625 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ