1645 अहवाल प्राप्त; 27 पॉझिटीव्ह, 15 डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि. 21 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1645 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1618 अहवाल निगेटीव्ह तर 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर एकाचा मृत्यू झाला.

त्याच प्रमाणे काल (दि.20) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  8956(7147+1632+177) झाली आहे, आज दिवसभरात 15 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 49274 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  47953 फेरतपासणीचे 239 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1082 नमुने होते. आजपर्यंत एकूण 48451 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 41304 तर पॉझिटीव्ह अहवाल 8956(7147+1632+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 27 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 27 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व 20 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोकुल कॉलनी व डाबकी रोड येथील प्रत्येकी तीन जण, जीएमसी व जठारपेठ येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित तांदली ता. पातूर, आस्टूल ता. पातूर, जनूना ता. पातूर, जूना तारफैल, र्सिसो ता. मुर्तिजापूर, मुर्तिजापूर, दहातोंडा, कोणवाडी, निंबा ता. मुर्तिजापूर, केलकर हॉस्पीटल, गोरे अपार्टमेंट आकाशवाणी मागे, रेणूका नगर, उमरी नाका, न्यू तापडीया नगर, अकोट, शिवणी व अकोट फैल येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

15 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 10 जण, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून एक जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून एक, तर हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अशा एकूण 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. अनोळखी रुग्ण 70 वर्षीय पुरुष असून तो दि. 19 नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

451 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8956(7147+1632+177)  आहे. त्यातील 288 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8217 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 451 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ