विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर


अकोला,दि. 26 (जिमाका)- जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि.1 जानेवारी  2021 या अर्हता दिनांकावर आधारीत जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत दि.17 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून या दि.15 डिसेंबर पर्यंत दावे व हरकत स्विकारण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने दावे व हरकती स्विकारण्याचा  कालावधी मंगळवार दि. 15  डिसेंबरपर्यंत तर विशेष मोहिमांचा कालावधी दि. 5 व 6 डिसेंबर, 12 व 13 डिसेंबर रोजी निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे इत्यादी करिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) यांचेकडे आवश्यक फॉर्म करुन देण्यात यावे. मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित, मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुद्धा या मोहिमेत होणार आहे. तरी अकोला जिल्ह्यातील सर्व संबधितांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम