आधारभुत योजनेअंतर्गत सात भरडधान्य खरेदी केन्द्रास मान्यता
अकोला,दि.2 (जिमाका)- आधारभुत योजनेअंतर्गत सन 2020-21 खरीप पणन हंगामात
केद्र शासनाने ज्वारी, मका, बाजरी इत्यादी भरडधान्य किमंत खरेदी योजनचा लाभ जिल्ह्यातील
भरडधान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळवा या दृष्टीने पुढील अटी व शर्तीच्या
अधिन राहून जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे अकोला व
बार्शीटाकळी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ संस्थेचे केंद्र शासकीय गोदाम अकोला
येथे, पातुर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ संस्थेचे केंद्र शासकीय गोदाम पातूर
येथे, बाळापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ संस्थेचे केंद्र शासकीय गोदाम
बाळापूर येथे, अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघ संस्थेचे केंद्र शासकीय गोदाम
अकोट येथे, तेल्हारा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ संस्थेचे केंद्र शासकीय गोदाम
तेल्हारा येथे तर मुर्तिजापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ संस्थेचे केंद्र
शासकीय गोदाम मुर्तिजापूर या सात खरेदी केन्द्रास मान्यता देण्यात येत असल्याचे
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.
अटी व
शर्ती :
शासनाने महाराष्ट्र स्टेट को ऑफ मार्केटिंग फेडरेशनची मुख्य अभीकर्ता
म्हणून बिगर आदीवासी क्षेत्राकरीता नेमणुक केली आहे. व जिल्हा मार्केटिंग अधिकारी या
मुख्य अभिकर्ता संस्थेने जिल्ह्यात तालुकासह. खरेदी विक्री
संघाची खरेदी अभिकर्ता म्हणुन नियुक्ती केली आहे, खरेदी अभिकर्ता संस्थेने खरेदी केंद्रांवर प्रशिक्षित ग्रेडर्स ची नेमणुक करावी व FAQ दर्जापेक्षा कमी दर्जाचे
धान्य खरेदी झाल्यास त्यामुळे काही तोटा असल्यास किंवा समस्या निर्माण झाल्यास
त्याची जबाबदारी अभिकर्ता संस्थेची राहील. FAQ दर्जाचे गुणवत्ता असावी, केद्रांवर आर्द्रता मापक यंत्र उपलब्ध करावे आर्द्रतामापक यंत्र
उपलब्ध नसल्यामुळे काही समस्या निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी खरेदी अभिकर्ता व
मुख्य अभिकर्ता या संस्थेची राहील, जिल्हा मार्केटिंगं
अधिकारी यांनी खरेदी केंद्रांवर प्रशिक्षित
कर्मचारी व मुलभुत सुविधा जसे चाचणी, पंखे, ताडपत्री, सेम्पंल पॉलीथीन पीशवी, आर्द्रतामापक यंत्र, बारादाना, व सुतळी इत्यादी
अभिकर्ता संस्थेने उपलब्ध ठेवण्याबाबत सुचना दयावी व बारदान्याचे
उपलब्धतेबाबत नियंत्रण रजिस्टर ठेवावे.
खरेदी प्रक्रियेत अनियमितता
घडल्यास खरेदी अभिकर्ता
संस्थेची जवाबदारी राहील. तहसिलदार, निरीक्षण अधिकारी, जिल्हा मार्केटिंगं अधिकारी,
पुरवठा निरीक्षक यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील खरेदी केंद्रास वेळोवेळी भेट देवून तपासणी करावी. FAQ दर्जापेक्षा कमी धान्य खरेदी
होणार नाही याची दक्षता घ्यावी. व तसा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात दर
आठवड्याला नियमीत सादर करावा, कोविड-19
प्रार्दुभावाच्या पार्श्वभुमीवर केंद्रा शासनाकडून नवीन ज्युट
बारदान्याचा मर्यादित केंद्र शासनाकडून प्राप्त होणारा बारदाना
शासनाच्या वतीने वित्तीय सल्लागार व उप सचिव कार्यालया मार्फत जिल्हास्तरावर वरील
गोदामामध्ये उपलब्ध करुन दिला जाईल. सदर गोदामापासून खरेदी केन्द्रापर्यंत बारदाना वाहतुक करुन नेण्याची जबाबदारी अभिकर्ता
या संस्थेची असेल.
कोविड-19 प्रादुर्भावच्या
पाश्वभुमीवर केंद्र शासनाकडून नवीन ज्युट बारदान्याचा पुरेसा पुरवठा होणार नसल्याने, दोन्ही अभिकर्ता
संस्थाना संपूर्ण हंगाम करिता लागणारा नविन बारदान वित्तीय सल्लागार व उप सचिव
कार्यालयाकडुन निविदाव्दारा उपलब्ध करुन दिला जाईल. सदर बारदाना निविदामार्फत
खरेदी केंद्रावर उपलब्ध करुन दिला जाईल, उत्पादीत
केलेले धान्य खरेदी केले जाईल या करीला दर दर्शविणारे आवक
फलक, खरेदी
केंद्रांस जोड़लेल्या गांवाची यादी शेतकऱ्यांनी धान्य खरेदी
करतेवेळी सातबारा सोबत आणने बंधनकारक आहे,
अशा आशयांचे सुचना फलक कृषी उत्पन्न बाजार
समिती यांनी खरेदी केन्द्राच्या दर्शनी भागात तसेच पंचायत समिती येथे
लावावे, खरेदी करताना शासनाच्या सूचनेप्रमाणे सातबारा उतारा पाहून उताऱ्याचे मागे खरेदीची नोंद घ्यावी. एकाच सातबाऱ्यावर पुन्हा खरेदी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
त्याच प्रमाणे सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे, खरेदी केलेले
धान्य शक्यतो त्याच दिवशी शासकीय गोदामात साठविण्यात यावे व
शासकीय गोदामपाल
यांचे कडून स्विकृती त्याच दिवशी फॉर्म ( वजन पावती ) यावर स्वाक्षरी घेवून ताव्यात घ्यावे. शासकीय गोदामपाल यांनी त्यांच्या ताब्यात धान्य घेताना व FAQ दर्जाचे
असल्याबाबत खात्री करावी व स्थानिक खरेदी नोदवहीत त्याचप्रमाणे
थप्पी रजिस्टर मध्ये नोंद घ्यावी. व दरमहा धान्य खरेदी स्विकृती सी फॉर्म मासीक जे विवरणपत्र सादर करावे.
खरेदी केंद्रांवर धान साधारण रु. 1868/- अ. दर्जा
रु.1888/-, ज्वारी ( संकरीत
) रु.2620/-, ज्वारी (नालदांडी
)
रु.2640/-, बाजरी रु. 2150/-, मका रु. 1850 /- बाजरी रु. 3295 प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करावी. खरेदी केद्रांवर आनलेल्या धान्य साठा ओला असू नये तसेच
जिल्ह्यातील ज्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये आधारभूत किमंती पेक्षा कमी दराने FAQ धान्य खरेदी विक्रीचे सौंदे होतील त्यांच्या विरुध्द महाराष्ट कृषी
उत्पन्न खरेदी अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात येईल याची
संबंधीताने नोंद घ्यावी.
खरेदी अभिकर्ता संस्था कृषि उत्पन्न बाजार
समिती व तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रा आधारभूत
किंमत खरेदी केंद्र सुरु झाल्याबाबत अहवाल या कार्यालयास सादर करावा, भरड
धान्य (ज्वारी, मका, बाजरी, रागी) खरेदीचा
कालावधी 1
नोव्हेबर ते 31 डिसेंबरपर्यतंचा निश्चित करण्यात आला आहे, धान्याची किमंत
अति प्रदान करणे व खर्चाची प्रतिपुर्ति करणेबाबत भरड धान्याची देण रक्कम शेतकऱ्याला ई-पेर्मेट व्दारे त्यांचे बँक खात्यामध्ये
जमा करण्यात यावी. खरेदी अभिकर्ता संस्थेने भरड धान्याचे
अतिप्रदान किंवा चुकीचे देयके सादर करु नये, खरेदी संबंधी लेखे अभिकर्ता
संस्था व गोदाम व्यवस्थापक व गोदामपाल यांनी
जतन करुन ठेवावे व त्या बाबतचे
अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात सादर करावे. वरील अटीच्या
अधिन राहून भरडधान्य खरेदी केद्रांस मंजुरी देण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा