मिशन बिगेन अंतर्गत 30 नोव्हेंबरपर्यंत आदेश कायम - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
अकोला,दि. 2(जिमाका)- कोरोना विषाणू
प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात 31 ऑक्टोंबरपर्यंत आदेश
लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदर आदेश 30
नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. यापुर्वी प्रशासनाव्दारे लावण्यात आलेले
निर्बंधामध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाऊन उघडण्याबाबतचे आदेश कायम
ठेवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश
जारी केला आहे.
सदरचे
संचारबंदीचे आदेश हे 30 नोव्हेंबरचे मध्यरात्रीपर्यंत
संपूर्ण अकोला शहर व जिल्हयातील शहरी व
ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा