अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांना प्रशिक्षण

 




अकोला,दि. 22 (जिमाका):  कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पारदर्शक व काळजीपूर्वक पार पाडावयाची असून, निवडणुकीचे पावित्र्यही जपणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी निवडणूकबाबतचे गांभीर्य जाणून निवडणूक प्रक्रीया उत्तमरित्या पार पाडण्याचे सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान पथकातील अधिकारी, कर्मचारी व मायक्रो ऑब्झर्व्हर यांचे प्रशिक्षण नियोजन भवनात आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक प्रशिक्षक उपायुक्त श्यामकांत मस्के, गजेंद्र बावणे, निवासी उपजिल्हाधिकारी व्यवहारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, श्रीकांत देशपांडे, रामेश्वर पुरी, अभेयसिंह मोहिते आदि तहसिलदार, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रशिक्षक श्यामकांत मस्के यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने विविध नियम व बाबींची माहिती दिली. मतपेटीची हाताळणी,  मतपत्रिकेचे स्वरूप, मतदान केंद्रांवरील सुविधा यासह मतदान प्रक्रियेतील प्रत्येक बाबींचे बारीकसारीक तपशीलासह प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. 

                                                मतदान केंद्रावर स्वतंत्र विलगीकरण कक्ष

मास्क असल्याशिवाय कुणाला प्रवेश देऊ नये. कोरोनाबाधित किंवा विलगीकरणात असलेल्या मतदारांना पोस्टल मतपत्रिकेची सुविधा देण्यात येणार आहे. मात्र, केंद्रावर आलेल्या एखाद्या मतदाराला ताप आदी लक्षणे आढळल्यास त्यांना टोकन देऊन दुपारी 4 वाजता मतदान केंद्रावर येण्याचे सूचित करावे. दरम्यान, त्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना पीपीई कीट देण्यात यावी.  लक्षणे आढळलेल्या व बाधित असलेल्या मतदारांसाठी केंद्रावर स्वतंत्रपणे बसण्यासाठी विलगीकरण कक्षाची सुविधा असावी.  प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आदी सुविधा ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

मतपत्रिकेचा रंग गुलाबी, जांभळ्या पेनाने नोंद

मतपत्रिकेचा रंग गुलाबी असेल, तसेच ती इंग्रजी व मराठी भाषेत असेल. केंद्रासाठी मतदार यादी तीन प्रतीत असेल. त्यातील एक चिन्हांकित असेल. जांभळ्या शाईचा विशेष पेन पुरवला जाईल. त्यानेच नोंदी होणे आवश्यक आहे. चुकूनही कुणीही इतर पेन वापरू नये, असे प्रशिक्षक श्यामकांत म्हस्के यांनी दिली.

            मतदान पथकातील सर्व अधिकारी कर्मचा-यांनी केंद्रापर्यंत जाण्या-येण्याचा रस्ता, पथकातील सदस्यांचे मोबाईल नंबर, आपल्या मतदान केंद्राचे विभेदक चिन्ह आदींबाबत सुस्पष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. लाख कांडी, कापडी पिशवी, लोखंडी पट्टी,  फॉर्म 19 चा गठ्ठा, उमेदवार व त्यांचे मतदान प्रतिनिधी यांची नमुना स्वाक्षरी,  जांभळ्या शाईचा विशेष पेन आदी साहित्य काळजीपूर्वक केंद्रावर नेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ