अकोला,दि. 20 (जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज
दिवसभरात झालेल्या 81 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, अकोट,
बार्शीटाकळी, मुर्तिजापूर व बाळापूर येथे चाचण्या झाल्या नाही, पातूर येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे एक चाचण्या
झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला
नाही, तसेच अकोला मनपा व अकोला आयएमए येथे चाचण्या झाल्या नाही, 18 वैद्यकीय
कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे 42 चाचण्या
झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे 13 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 81 चाचण्यांमध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 23939 चाचण्या
झाल्या त्यात 1679 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा