रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 109 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह
अकोला,दि. 4 (जिमाका)- कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात
झालेल्या 109 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, बाळापूर, बार्शीटाकळी, अकोट, पातूर,
तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही, तसेच अकोला मनपा येथे
चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 21 चाचण्या
झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला,
52 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या
त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे 33 चाचण्या झाल्या त्यात एकाचा
अहवाल पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे तीन चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 109 चाचण्यांमध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 22027 चाचण्या
झाल्या त्यात 1524 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा