बालगृहातील बालकांची आधार नोंदणी


अकोला,दि. 27 (जिमाका)- हिला व बालविकास विभागांतर्गत दि. 14 ते दि. 30 हा अनाथ पंधरवाडा म्हणुन साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने बालकांचे हक्क व अधिकार, बालविवाह, पॉक्सो कायदा या बाबत मार्गदर्शन जनजागृती कार्यक्रमांचे आयोजकरण्यात येत आहे. याच उपक्रमाअंतर्गत जिल्हयातील बालगृहातील बालकांची आधार नोंदणी करण्यात आली.

  यासंदर्भात महिला व बालविकास विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात  महिला व बालविकास विभागाअंतर्गत पाच बालगृह कार्यरत सून या  बालगृहामध्ये 135 काळजी व संरक्षणाची बालके निवासी राहतात. शासनाने आधार कार्ड अनिवार्य केल्यामुळे बालगृहातील ज्या बालकांचे आधार कार्ड नाही त्यांचे आधार कार्ड काढणे तसेच आधार कार्डवर चुकीची माहीती किंवा अपुर्ण माहीती आहे अशा कार्डचे नुतनीकरण करणे याकरीता जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने आधार कार्ड शिबीर बुधवार दि. 25 रोजी सुर्योदय बालगृह येथे घेण्यात आले.  

या शिबीराचे द्घाटन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांच्या हस्ते करण्यात  आले. या कार्यक्रमांचे संचालन ड संगिता कोंडाणे यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडूलकर यांनी केले. या शिबीरात आनंद बालिकाश्रम, शासकीय बालगृहसुर्योदय बालगृह या बालगृहातील बालकांचे आधार नोंदणी करण्यात आले. या शिबिराला  बालकल्याण समितीच्या अध्यक्षा पल्लवी कुळकर्णी, समिती सदस्या सुनिता कपीले यांनी भेट दिली. याप्रसंगी शासकीय बालगृहाचे अधिक्षक झुंबर जाधव, गायत्री बालिकाश्रमाच्या सुनिता चतुरकार, आनंद बालिकाश्रमचे आनंद सावनकर, सुर्यादय बालगृहाचे  प्रशांत देशमुख उपस्थित होते. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, सचिन घाटे, संगिता अभ्यंकर, सुनिल सरकटे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ