132अहवाल प्राप्त; 25 पॉझिटीव्ह, 11 डिस्चार्ज

 अकोला,दि. 13 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 132 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 107अहवाल निगेटीव्ह तर 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  8653 (6956+1520+177) झाली आहे. आज दिवसभरात 25 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 44617 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  43344फेरतपासणीचे 238 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1035 नमुने होते. आजपर्यंत एकूण 44539 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 37583 तर पॉझिटीव्ह अहवाल 8653 (6956+1520+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 25 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 25जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व 21 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आदर्श कॉलनी येथून तीन जण, जठारपेठ, शंकर नगर जठारपेठ व शिवकृपा क्लिनिक  येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरीत ज्ञानेश्वर नगर डाबकी रोड, देशमुख फैल, कान्हेरी सरप, गोरक्षण रोड, अंबिका रेसिडेन्सी, अंजनगाव सुर्जी, बार्शीटाकळी, केशव नगर, धारेल, सुकोडा, तेल्हारा, टाकळी, आलेगाव ता. पातूर, नित्यानंद नगर, मुर्तिजापूर व दत्ता कॉलनी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

11 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन जण, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून एक जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण, युनिक हॉस्पीटल येथून एक जण, तर हॉटेल स्कायलार्क येथून एक जण, अशा एकूण 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहेअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

223 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8653 (6956+1520+177)आहे. त्यातील 283 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8125 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 245 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ