संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून कोरोना चाचण्या वाढवा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 



अकोला,दि. 19(जिमाका)- आगामी काळात कोरोनाचा धोका वाढणार असून कोरोनाची दुसरी लाट येणाची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची दुसरी लाट  रोखण्याकरीता कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून चाचण्या तातडीने करा. याकरीता तालुकास्तरावर शिबीर घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित अधिकारी यांना दिले.

कोरोना विषाणु प्रतिबंधक उपाययोजनासंबंधी तालुकास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे कुसूमाकर घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, श्रीकांत देशपांडे, अभयसिंह मोहिते, मनपाचे वैद्यकीय अधिकारी फारुख शेख आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

माझे कुटूंब माझे जबाबदारी या मोहिमे अंतर्गत कोमार्बिड रुग्णाचा शोध घेण्यात आला असून अशा रुग्णाचा तातडीने तपासणी करुन कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचे शोध घेवून चाचण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी  विशेष करुन ग्रामीण भागात कोरोना चाचण्या वाढविण्यात यावे यासाठी मोठया गावात शिबीराचे आयोजन करावे. तसेच मास्क वापरण्याबाबत जनजागृती करावी तसेच आवश्यकतेनुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार  सोमवार दि. २३ पासून इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा.  शाळेचे निर्जंतूकीकरण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन शाळा सुरु कराव्यात. तसेच सर्व शिक्षकांचे कोविड-19 च्या चाचण्या तातडीने करा व सर्व शिक्षकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्याचे सूचना ‍ जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ