1257 अहवाल प्राप्त; 32 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज


अकोला,दि. 20 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1257 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1225 अहवाल निगेटीव्ह तर 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  

त्याच प्रमाणे काल (दि.19) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  8919(7120+1622+177) झाली आहे, आज दिवसभरात 14 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 47377 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  46060 फेरतपासणीचे 239 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1078 नमुने होते. आजपर्यंत एकूण 46806 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 39686 तर पॉझिटीव्ह अहवाल 8919(7120+1622+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 32 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 32 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व 25 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सुधीर कॉलनी, अकोट, मलकापूर, बालाजी नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित चांदुर खदान, मुर्तिजापूर, बाबूळगाव ता. पातूर, सहकार नगर, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, नया अंदुरा ता. बाळापूर, बाळापूर, चोहट्टाबाजार, गीता नगर, शिवचरण पेठ, मिलींद विद्यालय, हरिहर पेठ, गोरक्षण रोड, मोहम्मद अली रोड, कान्हेरी सरप व खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यात गंगा नगर येथील दोन जण, तर उर्वरित जगनवाडी अकोट, बोर्डी ता. अकोट व काजीपूरा ता. अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

14 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून नऊ जण, तर आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

430 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8919(7120+1622+177)  आहे. त्यातील 287 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8202 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 430 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ