402 अहवाल प्राप्त; 30 पॉझिटीव्ह, 15 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि. 19 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 402 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 372 अहवाल निगेटीव्ह तर 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर एकाचा मृत्यू झाला.  

त्याच प्रमाणे काल (दि.18) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  8879(7088+1614+177) झाली आहे, आज दिवसभरात 15 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 45966 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  44652 फेरतपासणीचे 239 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1075 नमुने होते. आजपर्यंत एकूण 45549 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 38461 तर पॉझिटीव्ह अहवाल 8879(7088+1614+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 30 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 30 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व 19 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ, राधे नगर, डाबकी रोड व गीता भवन शिवाजी पार्कजवळ येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मोठी उमरी, गौरक्षण रोड, दुर्गवाडा ता.मुर्तिजापूर, मुर्तिजापूर, अकोट, पातूर, गड्डम प्लॉट, जीएमसी, दहातोंडा ता. मुर्तिजापूर, पंचशील नगर खरप, शिवचरण पेठ, गोकुल कॉलनी, माधव नगर, आनंद पार्क नगर, वृंदावन नगर, परिवार कॉलनी, महादेव नगर, हेडगेवार ब्लॅड बँकजवळ व तुकाराम चौक येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिलांचा समावेश  असून ते जीएमसी, तापडीया नगर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

15 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, ओझोन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, तर हॉटेल रिजेन्सी येथून एक जण, अशा एकूण 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण डोनोरी ता. अकोट येथील 70 वर्षीय महिला असून ती दि. 18 नोव्हेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

404 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8879(7088+1614+177)  आहे. त्यातील 287 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8188 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 404 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम