126 अहवाल प्राप्त; 14 पॉझिटीव्ह, 11 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि. 4 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 126 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 112 अहवाल निगेटीव्ह तर 14 अहवाल पॉझिटीव्ह आले. एकाचा मृत्यू झाला.

त्याच प्रमाणे काल (दि.3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8484(6833+1474+177) झाली आहे. आज दिवसभरात 11 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 43598  जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  42415 फेरतपासणीचे 229 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 954 नमुने होते. आजपर्यंत एकूण 43466 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 36633 तर पॉझिटीव्ह अहवाल 8484(6833+1474+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 14 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 14 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 14 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर येथून चार जण, डाबकी रोड व वृंदावण नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बाळापूर, हेंडज ता. मुर्तिजापूर, कवाठा ता. मुर्तिजापूर, कावसा ता. अकोट, शिवणी खु. ता. मुर्तिजापूर व गोरक्षण रोड  येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 12  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 

11 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल  येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पिटल  येथून तीन,  हॉटेल रिजेन्सी येथून दोन, स्कायलार्क हॉटेल  येथून तीन अशा एकूण 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात लक्ष्मी नगर, डाबकी रोड येथील 70 वर्षीय महिला असून ती दि. 31 ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

201 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8484(6833+1474+177) आहे. त्यातील 282 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8001 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 201 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना