105 अहवाल प्राप्त; 10 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज

 अकोला,दि. 11 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 105 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 95 अहवाल निगेटीव्ह तर 108 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.10) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8600(6916+1507+177) झाली आहे. आज दिवसभरात 14 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 44431 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  43180 फेरतपासणीचे 237 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1014 नमुने होते. आजपर्यंत एकूण 44282 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 37366 तर पॉझिटीव्ह अहवाल 8600(6916+1507+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 10 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 10 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका पुरुषांचा समावेश असून ते जठारपेठ, अकोला येथील रहिवासी आहे. आज सायंकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यातील लक्ष्मी नगर गोरक्षण रोड व केशव नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरीत मुर्तिजापूर, जीएमसी, रमाई अपार्टमेंट गोरक्षण रोड, छत्रपती कॉलनी गोरक्षण रोड व  नूर प्लॉट जुने शहर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 

14 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार जण, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून दोन जण, ओझोन हॉस्पिटल येथून चार जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल स्कायलार्क येथून एक जण,  तर युनिक हॉस्पिटल  येथून एक जण, अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

223 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8600(6916+1507+177) आहे. त्यातील 283 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8094संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 223 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ