शिक्षक मतदारसंघाचा निवडणुकीची अधिसूचना जाहिर


                  

अकोला दि. 4 जिमाका : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना गुरूवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त (महसूल) किवा सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपायुक्त सामान्य प्रशासन, अमरावती विभाग, अमरावती याच्याकडे गुरूवार, दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत कोणात्याही दिवशी(सार्वजनिक सुट्टीव्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे दाखल करता येईल.  नामनिर्देशन पत्रे विभागीय आयुक्त विभागीय कार्यालय (महसूल) येथे मिळू शकतील. नामनिर्देशन पत्राची छाननी शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे करण्यात येईल.

उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवाराला किवा त्यांच्या कोणत्याही सूचकाला किवा उमेदवाराने लेखी प्राधीकृत केलेल्या निवडणूक प्रतिनिधीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त किवा सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपायुक्त सामान्य प्रशासन, अमरावती विभाग, अमरावती यांच्या कार्यालयात मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल.

 निवडणूक लढविली गेल्यास मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायं. 5 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक, अमरावती तथा  विभागीय आयुक्त  पियुष सिंह यांनी दिली आहे. असे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक, अमरावती जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ