78 अहवाल प्राप्त; पाच पॉझिटीव्ह, 12 डिस्चार्ज


अकोला,दि. 8 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 78 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 73 अहवाल निगेटीव्ह तर पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8546(6876+1493+177) झाली आहे. आज दिवसभरात 12 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 44135  जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  42900 फेरतपासणीचे 233 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1002 नमुने होते. आजपर्यंत एकूण 43962 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 37086 तर पॉझिटीव्ह अहवाल 8546(6876+1493+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज पाच पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात पाच जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यातील न्यू बैदपुरा रामदासपेठ, आदलापुर ता. अकोट, कौलखेड, अमणखा प्लॉट व बार्शिटाकली येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 

12 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात जणांना, आयकॉन हॉस्पिटल  येथून दोन जण, ओझोन हॉस्पिटल  येथून एक जणहॉटेल स्कायलार्क येथून दोन जण, अशा एकूण 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

201 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8546(6876+1493+177) आहे. त्यातील 282 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8063 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 201 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ