ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

 


          अकोला,दि.24(जिमाका)- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात या उद्देशाने जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोलाचे वतीने   ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयेाजन दिनां‍क 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत करण्‍यात आलेले आहे.         

                        सदर मेळाव्‍यामध्‍ये  नामांकित खाजगी उद्योजक, कंपनीत्‍यांचे प्रतिनिधी  विविध पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबव‍तील.  दहावी, बारावी, आय.टी.आय.,पदवीकापदवीधारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना  ऑनलाईन अप्‍लॉय करुन या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी होता येईल.

            कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागाच्‍या -  www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नाव  नोंदणी केलेल्‍या दहावी,  बारावी,  पदवी, आयटीआय पास, पदवीकापदवी पुरुष तसेच  महिला  उमेदवारांनी आपल्‍या सेवायोजन कार्ड ( Employment Card ) चा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉग इन  मधुन ऑनलाईन अप्‍लॉय करु शकतात. ऑनलाईन अप्‍लॉय केलेल्‍या उमेदवारांचे कंपनी, उद्योजकएच.आर.प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया राबवितील.

            सदर ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात  जास्‍तीत जास्‍त  उमेदवारांनी आपल्‍या शैक्षणीक पात्रतेच्‍या आधारे ऑनलाईन अप्‍लॉय करुन सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्‍त प्रा.यो.बारस्‍कर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ