इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र



अकोला,दि.१८ (जिमाका)-  इयत्ता दहावी व बारावी च्या  शुक्रवार दि.२० पासू सुरु होणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठी जिल्ह्यात आठ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.  जिल्ह्यात बारावीचे ६७२ तर इयत्ता दहावीचे ५१८ विद्यार्थी या परीक्षेस बसले आहेत. या संदर्भात परीक्षांच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. 

इयत्ता १२ वी ची परीक्षा केंद्रः- १) शहाबाबू उर्दू कॉलेज, अकोला, २)सिताबाई ज्युनिअर कॉलेज, ३)श्री शिवाजी महाविद्यालय, अकोट, ४) एस.बी. कॉलेज, तेल्हारा, ५)श्रीमती धनाबाई कनिष्ठ महाविद्यालय, बाळापूर

इयत्ता १०वी ची परीक्षा केंद्रः- १) मुंगिलाल बाजोरिया कॉन्व्हेंट  स्कूल, अकोला, २) नरसिंग विद्यालय, अकोट, ३)  अंजुमन उर्दू हायस्कूल बाळापूर

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एक तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. तेथे त्यांची थर्मल गन व पल्स ऑक्सिमिटरच्या सहाय्याने चाचणी करावी असे निर्देशही देण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ