रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 94 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह
अकोला,दि. 2 (जिमाका)- कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात
झालेल्या 94 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, बार्शीटाकळी, पातूर व
मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही, अकोट येथे 16 चाचण्या झाल्या
त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे
तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे दोन चाचण्या झाल्या त्यात
एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे
चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 32 चाचण्या
झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला,
26 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या
त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे 10 चाचण्या झाल्या त्यात एकाचा
अहवाल पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे पाच चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 94 चाचण्यांमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 21751 चाचण्या
झाल्या त्यात 1509 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा