112 अहवाल प्राप्त; 18 पॉझिटीव्ह, 24 डिस्चार्ज
अकोला,दि.1 (जिमाका)-आज
दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच
वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 112 अहवाल प्राप्त झाले.
त्यातील 94 अहवाल निगेटीव्ह तर 18 अहवाल
पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल (दि.31) रॅपिड ॲटीजेन
टेस्ट मध्ये दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता
अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8416(6788+1451+177) झाली आहे. आज दिवसभरात 24 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 43276 जणांचे
नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 42103 फेरतपासणीचे 226 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 921
नमुने होते. आजपर्यंत एकूण 43087 अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 36299
तर पॉझिटीव्ह अहवाल 8416(6788+1451+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
आज 18 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. आज सकाळी 18 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे.
त्यातील कौलखेड व खडकी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित
पक्की खोली सिंधी कॅम्प, चौरे प्लॉट, शास्त्री
नगर, वरुड जवळका, जीएमसी हॉस्टेल,
रामदास पेठ, सिंधी कॅम्प, गणेश नगर, राऊत वाडी, मराठा
नगर, मोठी उमरी, कपिलवास्तू , छोटी उमरी व पोलीस स्टेशन येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.
तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल
रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये दोन जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला होता.
24 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय येथून पाच जणांना, हॉटेल रिजेन्सी येथून चार जण, कोविड केअर सेंटर
मुर्तिजापूर येथून दोन जण, अकोला अॅक्सीडेंट क्लिनिक येथून
दोन जण, हॉटेल स्कायलार्क येथून एक जण, तसेच होम आयसोलेशनचा
कालावधी पूर्ण झाला अशा 10 जणांना, अशा
एकूण 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक
कार्यालयातून देण्यात आली आहे.
209 रुग्णांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा