844 अहवाल प्राप्त; 70 पॉझिटीव्ह, 13 डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि. 25 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 844 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 774 अहवाल निगेटीव्ह तर 70 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तसेच आज एकाचा मृत्यू झाला.

त्याच प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 18 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9208(7346+1685+177) झाली आहे, आज दिवसभरात 13 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 52743 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  51396 फेरतपासणीचे 239 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1108 नमुने होते. आजपर्यंत एकूण 52450 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 45104 तर पॉझिटीव्ह अहवाल 9208(7346+1685+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 70 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 70 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 17 महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ येथील पाच जण, प्रभात किड्स येथील तीन जण, कौलखेड, कुंभारी, अमाख्या प्लॉट व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित लोहगड ता. बार्शिटाकळी, धाबा ता. बार्शिटाकळी, तेल्हारा, पातूर, अकोट रोड, हिंगणा रोड, विद्युत नगर, रिधोरा ता.बाळापूर, पत्रकार कॉलनी, खिरपूरी, लोहारा ता. बाळापूर, बंबर्डा ता. अकोट, मलकापूर रोड, दुर्गा चौक, बाळापूर, गोरक्षण रोड, किनखेडपुर्णा ता. अकोट व मोठी उमरी  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 36 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 18 महिला व 18 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सिंधी कॅम्प येथील आठ जण, कौलखेड येथील पाच जण, शंकर नगर व रणपिसे नगर येथील प्रत्येकी तीन जण, गोरक्षण रोड, पातूर व गिरी नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जीएमसी क्वॉटर, अकोट, जीएमसी, शिवर, शिवाजी नगर, शिर्ला अंधारे, आस्टूल, रतनलाल प्लॉट, डाबकी रोड, शिवाजी नगर व मलकापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

13 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात जण, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, अशा एकूण 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पंचशील नगर, सिव्हील लाईन येथील 70 वर्षीय पुरुष असून तो दि. 18 नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

577 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9208(7346+1685+177) आहे. त्यातील 289 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8342 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 577 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ