अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत शेतकऱ्यांसाठी 26 कोटी 78 लक्ष 73 हजार निधी प्राप्त


अकोला,दि. 11 (जिमाका)- जिल्ह्यात जून ते ऑक्टोंबर 2020 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यासाठी  मा. विभागीय आयुक्त अमरावतीव्दारे पहिला हप्ता 26 कोटी 78 लक्ष 73 हजार निधी प्राप्त झाला आहे.

अकोला तालुक्यात 181.13 हेक्टर बाधित शेतीसाठी 5 कोटी 66 लक्ष 3 हजार रुपये, बार्शिटाकळी तालुक्यात 45.74 हेक्टर बाधित शेतीसाठी 1 कोटी 42 लक्ष 95 हजार रुपये, अकोट तालुक्यात 165.83 हेक्टर बाधित शेतीसाठी 5 कोटी 18 लक्ष 22 हजार रुपये, तेल्हारा तालुक्यात 101.78 हेक्टर बाधित शेतीसाठी 3 कोटी 18 लक्ष 7 हजार रुपये, बाळापूर तालुक्यात 201.62 हेक्टर बाधित शेतीसाठी 7 कोटी 27 लक्ष 78 हजार रुपये, पातूर तालुक्यात 51.28 हेक्टर बाधित शेतीसाठी 1 कोटी 62 लक्ष 27 हजार रुपये व मुर्तिजापूर तालुक्यात 77.78 हेक्टर बाधित शेतीसाठी 2 कोटी 43 लक्ष 41 हजार रुपये असे एकूण 26 कोटी 78 लक्ष 73 हजार रुपये वितरणासाठी प्राप्त झाले आहे.

 जून ते ऑक्टोंबर या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे तसेच बहुवार्षिक पिकांचे 33 टक्केच्यावर नुकसान झालेले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 10 हजार रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये या दराने दोन हेक्टर मर्यादापर्यंत मदत देण्यात येत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ