पातूर व बार्शिटाकळी येथे अनुज्ञप्ती शिबीर
अकोला,दि.3(जिमाका)- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून
बार्शिटाकळी व पातूर या ठिकाणी जनतेची कामे वेळेत व सुरळीत होण्याच्या दृष्टीने
नव्याने मासिक दौरे आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार
पातुर तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात 10 व 24 रोजी, तर डिसेंबर महिन्यात 7 व
21 रोजी होणार आहे. तसेच बार्शिटाकळी तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात 12 व 27 रोजी,
तर डिसेंबर महिन्यात 10 व 31 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह येथे
होणार आहे.
तालुक्यातील अर्जदारांनी उपलब्ध संधीचा
लाभ घेण्याकरीता आपली अनुज्ञप्ती विषयक कामकाज वरील तारखेत करुन घ्यावे. तसेच
अर्जदारांनी वरिल तारखेस आवश्यकते प्रमाणे
parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन sarathi.nic.in या पोर्टलवर आपले
कामाकरिता ऑनलाईन अपॉयमेन्ट घेणे आवश्यक आहे. अपॉयमेन्ट असणाऱ्याच अर्जदारांची
अर्ज स्विकारण्यात येतील, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार
यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा