जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध व नियमित संनियत्रण मोहिम राबविणार



         अकोला,दि. 10 (जिमाका)-  जिल्ह्यात 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत  राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत सक्रिय कुष्ठरुग्ण शोध व नियमित संनियत्रण मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने  जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या सभेचे आयोजन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्रीबाई राठोड, जिल्हा शल्य चिकीत्सक अधिकारी डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  सुरेश आसोले,  मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.फारुख शेख,  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मेघा गोळे, नर्सिग महाविद्यालयाचे प्राचार्य संगिता साने, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, डॉ. एम.एस. मोहिते व  आदि अधिकारी उपस्थित होते.

            जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन अंतर्गत नवीन कुष्ठरोग शोधून त्यांच्यावर पूर्ण कालावधीपर्यंत मोफत औषधोपचार घेवून विकृती प्रतिबंध करणे व समाजातील  कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडीत करने, जनजागृतीव्दारे या रोगाबाबत गैरसमज व कलंक कमी करता यावे, यासाठी जिल्हयात 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत सक्रिय कुष्ठरुग्ण शोध व नियमित संनियत्रण सर्वक्षण मोहिम राबविण्यात येणार आहे. नवीन विना विकृती संशयीत कुष्ठरोगी तसेच नवीन विकृत व असंसर्गीत कुष्ठरोगाचा शोध घेणाऱ्या आशा वकर्सला मानधन देण्यात येणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ