1459 अहवाल प्राप्त; 52 पॉझिटीव्ह, 13 डिस्चार्ज

 


अकोला,दि. 22 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1459 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1407 अहवाल निगेटीव्ह तर 52 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.21) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9019(7199+1643+177) झाली आहे, आज दिवसभरात 13 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 50820 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  49495 फेरतपासणीचे 239 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1086 नमुने होते. आजपर्यंत एकूण 49910 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 42711 तर पॉझिटीव्ह अहवाल 9019(7199+1643+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 52 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 52 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 45 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 13 महिला व 32 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील 13 जण, जीएमसी व जूने शहर येथील प्रत्येकी तीन जण, डाबकी रोड, तापडीया नगर, दहातोंडा ता. मुर्तिजापूर, जठारपेठ व एसबीआय कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित भिम नगर, कुंभारी, मोठी उमरी, वाडेगाव ता. बाळापूर, बाळापूर, कान्हेरी गवळी ता. बाळापूर, दिपक चौक, मयूर कॉलनी, मुकूंद नगर, मिलींद नगर, लहान उमरी, तथागत नगर, मलकापूर, तळेगाव ता. तेल्हारा, जूने केतननगर व दानापूर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सातव चौक येथील दोन जण, तर उर्वरित बार्शीटाकळी, जठारपेठ, सिध्दीविनायक कॉलनी, गौरक्षण रोड व माळा कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

13 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून दोन, तर हॉटेल रिजेन्सी येथून दोन, अशा एकूण 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

501 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9019(7199+1643+177) आहे. त्यातील 288 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8230 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 501 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ