अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता स्वाधार योजना

 


अकोला,दि. 26 (जिमाका)- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. सन 2019-20 मध्ये ज्या पात्र विद्यार्थ्यांना प्रथम टप्याचा लाभ मिळालेला आहे व ज्या विद्यार्थ्यांना अद्यापी द्वितीय टप्याचा लाभ मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी प्रपत्र 13 चे अर्ज परिपूर्ण भरुन ( प्राचार्याचे सहि व शिक्यानिशी) या कार्यालयात 31 डिसेंबर 2020 पूर्वी सादर करावे जेणेकरुन संबंधीत विद्यार्थ्यांना त्यांचा द्वितीय टप्प्याची रक्कम ( शासनाकडून तरतूद प्राप्त होताच ) त्यांचे आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करणे या कार्यालयास सोईचे होईल. कार्यालयात प्रपत्र 13 सादर करतांना विद्यार्थ्यांनी स्वतःचे बॅंकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची  व आधारकार्डची छायाप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही,  अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त  माया केदार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ