‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत आढळलेल्या कोमार्बिड व्यक्तींच्या कोविड तपासणी वाढवा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
अकोला,दि. 4 (जिमाका)- जिल्हा
प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत
घरोघरी सर्वे करुन कोमार्बिड व्यक्तींचा शोध घेण्यात आला होता. अशा व्यक्तीची
कोविड तपासणी वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोविड-19
आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ
कटीयार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, डॉ.
कुसमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
सुभाष आसोले, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, निवसी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, मनपाचे वैद्यकीय अधिकारी
डॉ. फारुख शेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जिल्हा साथरोग
अधिकारी सुनिल मानकर, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. श्यामसुंदर सिरसाम, डॉ. आदित्य महानकर
यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोविड संबंधी बेसावध न होता लोकानी
काळजी घ्यावी. मास्क न वापरण्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. नो मास्क नो एन्ट्री,
नो मास्क नो सर्व्हीस या मोहिमे काटेकोरपणे अमंलबजावणी करण्याचे संबंधिताना
निर्देश दिले. कोविड तपासणी वाढविण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केन्द्राव्दारे प्रतीदिवस किमान 10 तपासण्या,
ग्रामीण रुग्णालयाव्दारे किमान 25 तपासण्या, तसेच शहरी भागात झोननिहाय किमान 50
तपासण्या होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
ऑक्सीजन पुरवठा, यंत्रसामुग्री तसेच इतर अडीअडचणीबाबत आढावा घेण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा