रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 65 चाचण्या, चार पॉझिटिव्ह


अकोला,दि. 14 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 65 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ला. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, अकोट, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर, तेल्हारा मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही, तसेच अकोला मनपा व अकोला आयएमए येथे चाचण्या झाल्या नाही, 30 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे  32  चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 65  चाचण्यांमध्ये चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 23436 चाचण्या झाल्या त्यात 1611 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ