280 अहवाल प्राप्त; 30 पॉझिटीव्ह, चार डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि. 18 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 280 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 250 अहवाल निगेटीव्ह तर 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर एकाचा मृत्यू झाला.  

त्याच प्रमाणे काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 29 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  8836(7058+1601+177) झाली आहे, आज दिवसभरात चार रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 45527 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  44225 फेरतपासणीचे 239 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1063 नमुने होते. आजपर्यंत एकूण 45147 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 38089 तर पॉझिटीव्ह अहवाल 8836(7058+1601+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 30 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 30 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 10 महिला व 20 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी, गौरक्षण रोड व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, गजानन पेठ, निमवाडी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित आळशी प्लॉट, शास्त्री नगर, पिकेव्ही, वाडेगाव, राधेनगर, गड्डम प्लॉट, देवी खदान , मलकापूर, बाळापूर, कौलखेड, विद्या नगर, हरिहरपेठ व जळगाव नहाटे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

चार जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून दोन जण, अशा एकूण चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जामठी बु. ता मुर्तिजापूर येथील 80 वर्षीय महिला असून ती दि. 14 नोव्हेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

377 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8836(7058+1601+177) आहे. त्यातील 286 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8173 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 377 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ