डाक अदालतीचे 1 डिसेंबर रोजी आयोजन

 


 

अकोला,दि. 18 (जिमाका)-  डाक सेवे बाबत जसे टपाल स्पीड पोस्ट, डाक वस्तु, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतची आपली  तक्रार सहा आठवड्या पेक्षा जास्त काळ अनुत्तरीत असल्यास तक्रारीचे निवारण लवकर होण्यासाठी आपण डाक अदालत मध्ये दाद मागू शकता. 

          अनुत्तरीत तक्रार बाबत अर्ज व त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत  ज्या अधिका-याकडे दाखल केली त्याचा हुद्दा व दाखल केल्याची तारीख, एका अर्जासोबत एकच तक्रार असावी,  आपली तक्रर दि.25 नोव्हेंबर 2020 पुर्वी सक्षम अथवा पोस्टाने पाठवावी.

 

डाक अदालत दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वा. कार्यालय  प्रवर अधिक्षक ,डाकघर अकोला विभाग,  अकोला सिव्हील लाइन्स अकोला-444001 येथे भरेल. त्यामध्ये सदर व्यक्तीस स्वत:चे खर्चाने हजर राहता येईल. असे आवाहन   प्रवर अधिक्षक, डाकघर अकोला विभाग,  अकोला सिव्हील लाइन्स अकोला-444001 यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ