192 अहवाल प्राप्त; 28 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज

 अकोला,दि. 30 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 192 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 164 अहवाल निगेटीव्ह तर 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.29) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  ९४१६(७५१६+१७२३+१७७) झाली आहे. आज दिवसभरात  रुग्णालयात असलेल्या 14 रुग्णांना घरी सोडण्यात आले,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 54429 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 53055  फेरतपासणीचे 246 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1128 नमुने होते. आजपर्यंत एकूण 54145 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 46629 तर पॉझिटीव्ह अहवाल ९४१६(७५१६+१७२३+१७७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 28 पॉझिटिव्ह

आज सकाळी २८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला आणि १९ पुरुष आहेत.  त्यातील चार जण गड्डम प्लॉट येथील, दोघे सिव्हिल लाईन्स येथील तर उर्वरित तुकाराम चौक,  शिवाजी पार्क देशमुख फैल,  सांगवी खु., सोंजवी खु.,  जीएमसी, गायत्री नगर, कौल खेड,  गिताभवन शिवाजी पार्क जवळ,  नवलेवाडी अकोट,  शिवचरण पेठ, तेल्हारा,  डाबकी रोड, राजंदा ता. बार्शी टाकळी,  नंदखेड दहिहांडा ता. अकोट,  श्रद्धा लेआऊट,  आपातापा, रामनगर, व्यंकटेश नगर,  दहिगाव ता. तेल्हारा,  सुधीर कॉलनी, मुर्तिजापूर,  परिअम्मा कॉलनी खारोळेवाडी येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत.  तर आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.दरम्यान काल (दि.२९) रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह संख्येत करण्यात आला आहे.

14 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 12, तर आयकॉन हॉस्पीटल येथून दोन,  अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

642 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ९४१६(७५१६+१७२३+१७७) आहे. त्यातील 293 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8481 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 642 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ