अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

                  

अकोला दि. 5 जिमाका : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या घोषित निवडणुकीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी  मुकेश चव्हाण, अधिक्षक मिरा पागोरे यांची उपस्थिती होती.

घोषित निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी ही सार्वत्रिक निवडणुकीच्या आचार संहितेप्रमाणेच  करावयाची असुन त्यात काटेकोर दक्षता पाळावयाची आहे. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. तसेच कोविड प्रतिबंधाबाबत जनजागृतीही केली जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणुक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात विविध विभागांनी केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हा निवडणुक  शाखेस तात्काळ सादर करावा, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.

अधिसूचित सेवा ऑनलाईन करा

लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अर्जदाराना पुरविण्यात येणाऱ्या सर्व अधिसूचित सेवा संबंधित यंत्रणांनी ऑनलाईन कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्राव्दारे ऑनलाईन पद्धतीने सर्व सेवा पुरविल्या जातील याची दक्षता घेणे. ऑफलाईन पद्धतीच्या प्राप्त अर्जाची माहिती विविध प्रपत्राव्दारे दरमहा महसूल विभागाला सादर करणे. नागरिकाना सेवा पुरविताना अधिक गतिमान, कार्यक्षम, पारदर्शक पद्धतीने कसे करता येईल? याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला. जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन पद्धतीने पुरविण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ