119 अहवाल प्राप्त; 20 पॉझिटीव्ह, 16 डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि. 17 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 119 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 99 अहवाल निगेटीव्ह तर 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर एकाचा मृत्यू झाला.  

त्याच प्रमाणे काल (दि.16) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  8777(7028+1572+177) झाली आहे, आज दिवसभरात 16 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 45134 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  43852 फेरतपासणीचे 239 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1043 नमुने होते. आजपर्यंत एकूण 44867 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 37839 तर पॉझिटीव्ह अहवाल 8777(7028+1572+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 20 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 20 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 10 महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे. त्यात केशवनगर येथील आठ जण, शिवचरण पेठ येथील तीन तर उर्वरीत सहकार नगर, कान्हेरी सरप, गजानन पेठ, शास्त्री नगर,खदान, सिंधी कॅम्प,उमरि, पातूर नंदापुर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच  आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

16 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ जण, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून चार जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जण, तर हॉटेल रीजेंसी येथून एक जण, अशा एकूण 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान पारस ता. बाळापूर येथील 66 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना 9 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

323 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8777(7028+1572+177) आहे. त्यातील 285 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8169 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 323 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ