162 अहवाल प्राप्त; 18 पॉझिटीव्ह, सात डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि. 10 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 162 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 144 अहवाल निगेटीव्ह तर 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच एकाचा मृत्यू झाला.

त्याच प्रमाणे काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8585(6906+1502+177) झाली आहे. आज दिवसभरात सात रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 44349  जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  43106 फेरतपासणीचे 237 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1006 नमुने होते. आजपर्यंत एकूण 44177 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 37271 तर पॉझिटीव्ह अहवाल 8585(6906+1502+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 18 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 18 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व 12 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील ट्वीन बंगला गौरक्षण रोड येथून चार जण, गजानन पेठ राऊतवाडी येथून तीन जण, बार्शिटाकळी येथून दोन जण, तर उर्वरित पारस, भांबेरी ता. तेल्हारा, शास्त्री नगर, रामदास पेठ, पाकली, भागवतवाडी जूने शहर, मुर्तिजापूर, रणपिसे नगर व राम नगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 

सात जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच जणांना, तर हॉटेल रिजेंसी  येथून दोन जण, अशा एकूण सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गजानन नगर, डाबकी रोड येथील 55 वर्षीय पुरुष असून तो दि. 2 नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

222 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8585(6906+1502+177) आहे. त्यातील 283 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8080 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 222 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ