रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 110 चाचण्या, 15 पॉझिटिव्ह

 अकोला,दि. 30 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 110 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात  आयएमए येथे 15 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एक पॉझिटीव्ह आले. 26 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या  चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. अकोला जीएमसी येथे 52 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर हेडगेवार प्रयोगशाळा येथे 17 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सहा जण पॉझिटीव्ह आले. आजपर्यंत 25238 चाचण्या झाल्या त्यात 1786 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ