मुख्य सामग्रीवर वगळा
बाल सरंक्षण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधीकडून अर्ज आमंत्रीत
अकोला,दि.3(जिमाका)- महिला व बालविकास
विभागाअंतर्गत जिल्ह्यामध्ये प्रतिपालकत्व, प्रायोजकत्व व अनुरक्षण या संस्थेत्तर
सेवांच्या अमंलबजावणीसाठी स्पॉनसरशिप व फोस्टर केअर अप्रुव कमिटी स्थापण
करण्याकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मार्फत जिल्ह्यात स्वयंसेवी
संस्थेतील दोन प्रतिनीधी यांची निवड करावयाची आहे. जिल्ह्यातील महिला व बाल विकास
क्षेत्रात काम करणाऱ्या व समाजकार्याची आवड असणाऱ्याकडून समितीवर विना मानधन
तत्वावर दोन प्रतिनधी निवड करावयाची आहे. त्याकरिता आपला अर्ज जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी कार्यालय, पहिला मजला, प्रशाकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय,
अकोला येथे सादर करावे. तसेच अर्जाची प्रत कार्यालयाच्या dwcdoakl@yahooco.in या ईमेल आयडीवर
पाठविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डि.डि. इंगळे यांनी
केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा