मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमेत्तिक रजा

 अकोला,दि. 29 (जिमाका)- अमरावती  विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी ( दि.1 डिसेंबर रोजी) शिक्षकांना विशेष नैमेत्तिक रजा मंजूर करण्यात यावी, असे निर्देश अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना  जिल्हाधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ही रजा कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा